Breaking News

कुलाबा किल्ल्यातील तोफगाड्याची मोडतोड; अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी

ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यात बसविण्यात आलेल्या सागवानी तोफगाड्याची अज्ञाताने तोडफोड केली असल्याची तक्रार सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अलिबाग पोलीस ठाणे आणि पुरातत्त्व विभागाकडे दाखल करण्यात आली आहे. कुलाबा किल्ल्यात तीन तोफा जमिनीवर पडल्या होत्या. त्या तोफांसाठी सह्याद्री प्रतिष्ठानने लाकडी गाडे दिले होते. या तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा 20 जानेवारी रोजी रघुजीराजे आंग्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. यापैकी एका तोफगाड्याची तोडफोड झाल्याचे 9 ऑक्टोबर रोजी निदर्शनास आले. याबाबत सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा दुर्ग संवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी अलिबाग पोलीस ठाणे व पुरातत्त्व विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामध्ये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या तक्रार अर्जाची प्रत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संचालकांना तसेच रायगडच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे.

Check Also

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार करीत …

Leave a Reply