उरण ः प्रतिनिधी
जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी हे भाजप कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उरणच्या विकासासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा, भाजप कार्यकर्त्यांचा आदर करणार्या महेश बालदी यांना गव्हाण विभागातून मताधिक्यांची निश्चित आघाडी मिळवून देणार, असा निर्धार भाजप वाहतूक विभागाचे राज्य उपाध्यक्ष निर्गुणभाई कवळे यांनी व्यक्त केला आहे.
निर्गुणभाई कवळे यांनी पुढे सांगितले की, आज सिडकोच्या माध्यमातून गव्हाण विभागाचा कायापालट होत असून येथील रहिवाशांना नागरी सुविधा या शासनाच्या व सिडकोच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हाध्यक्ष सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी हे करीत आहेत.
त्यामुळे गव्हाण विभागाच्या विकासासाठी हातभार लावणारे भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी हे आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिटी ही निशाणी घेऊन अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असतील, तर महेश बालदी यांना येथील रहिवाशांचे, जनतेचे नेतृत्व विधानसभेत करण्यासाठी या विभागातून निश्चित मताधिक्याची आघाडी मिळवून देणार, असा विश्वास निर्गुणभाई कवळे यांनी व्यक्त केला आहे.