Breaking News

कसोटी स्पेशलिस्ट खेळाडूंना सरावासाठी मिळणार ड्युक चेंडू

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताचे अव्वल कसोटीपटू पुढील दोन महिने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) व्यस्त राहतील, पण जर या टी-20 स्पर्धेदरम्यान ते लाल चेंडूने सराव करण्यास इच्छुक असतील तर भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) त्यांना ड्युक चेंडू उपलब्ध करून देण्यासाठी तयारी आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाचा कसोटी कार्यक्रम बघता असे केले जाऊ शकते.

भारताला आयपीएलनंतर 18 ते 22 जून या कालावधीत न्यूझीलंडविरुद्ध साउथम्पटनमध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत खेळायची आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, पण हा पूर्णपणे पर्याय राहील ज्याचा बीसीसीआयसोबत करारबद्ध खेळाडूंना लाभ घेता येईल.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, जर खेळाडूंना वाटते की त्यांना लाल चेंडूने सराव करायचा आहे, तर बीसीसीआय त्यांना लाल ड्यूक चेंडू उपलब्ध करून देईल. कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक लगेच त्यांना सहकार्य करतील. आयपीएल फायनल व विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल याच्यादरम्यान केवळ 20 दिवसांचा फरक आहे. त्यामुळे बोर्डने हा पर्याय ठेवला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply