
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून, रिक्षा चालक-मालक संघटनेच्या शेकाप कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.
पनवेलमधील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशात शेकापचे दिलीप गावंड, दामोदर पाटील, अविनाश मोकल, सुनील यादव, जयराम म्हात्रे, विलास गावंड, विनोद पवार, मंगेश मोकल, वसीर दाखवे, राजेंद्र म्हात्रे, दिलीप खामकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे कर्नाळा विभागीय नेते गणेश पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, मोतीलाल कोळी, उमेश पाटील, जीवन टाकले, पांडुरंग पाटील, रवींद्र कोरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी रवी नाईक यांनी या पक्षप्रवेशासंदर्भात अधिक माहिती दिली. पनवेलमध्ये भाजपची ताकद वाढत आहे.