पनवेल : रामप्रहर वृत्त
केरळ येथे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा (अन इक्विप) झाली. यामध्ये महाराष्ट्र संघातून रायगडचे पॉवर लिफ्टिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश कृष्णा पाटील (आपटी, ता. खोपोली) हे सहभागी झाले होते. 59 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्रातर्फे भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आणि रौप्य पदक मिळविले. आतापर्यंत त्यांनी राज्य स्पर्धेत (40 वर्षावरील गटात) मास्टर्स एक स्पर्धेत चार सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. ही राष्ट्रीय स्पर्धा 26 ते 30 सप्टेंबर या कालावधीत इडुपी (केरळ) येथे झाली. महेश पाटील यांच्या यशाबद्दल रायगड पॉवर लिफ्टिंगचे गिरीश वेदक, यशवंत मोकल, राहुल गजरमल, सचिन भालेराव, अरुण पाटकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.