Breaking News

मजदूर संघ प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी

बैठकीत घेतला पाठिंबा देण्याचा निर्णय

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्हा भारतीय मजदूर संघाची कार्यकारिणी बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना, तर उरण मतदारसंघातील महेश बालदी यांना जाहीर पाठिंबा देण्याचे जाहीर केले. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या वेळी भारतीय मजदूर संघाचे कोकण विभाग संघटक अ‍ॅड. अनिल डूमणे, प्रदेश संघटक रवींद्र पुरोहित, बांधकाम संघटक मोहन पवार, तालुका अध्यक्ष रवी नाईक, सचिव रमेश गोविलकर, जिल्हा संघटक श्रीधर लहाने, खजिनदार रवींद्र दानवे यांच्यासह भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply