पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांचा दांडगा जनसंपर्क, युवकांच्या प्रश्नांवरील संवेदनशीलता आणि सतत लोकांमध्ये राहून केलेल्या कामांमुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
आनंद ढवळे यांनी यापूर्वी पनवेल तालुका भाजयुमो अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून त्यांच्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. युवकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय ठरला आहे. भाजच्या संघटनात्मक निवडणुका अंतर्गत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आणि पक्षाच्या नियमानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी ढवळे यांची नियुक्ती नुकतीच जाहीर केली.
’प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ असा भाजपचा मूलमंत्र आहे. त्यामुळे या पक्षाच्या माध्यमातून आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सतत समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने युवा मोर्चाच्या माध्यमातूनही उपक्रम आयोजित केले जातात. त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी आनंद ढवळे यांनी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या पार पाडली. त्याचबरोबर जनसंपर्कात राहून लोकांची कामे करत राहणे हा त्यांचा चांगला गुण आहे. सातत्याने पनवेल, उरण या तालुक्यात त्यांनी काम केले आहे. तालुकाध्यक्षपदावर काम करताना संघटना बळकट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
पनवेल व उरण तालुक्यात ढवळे यांनी सातत्याने काम करत लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असून या नियुक्तीमुळे उत्तर रायगडमधील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने आनंद ढवळे यांनी पक्षश्रेष्ठींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उत्तर रायगडातील युवकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवणे, समाजोपयोगी उपक्रम राबविणे आणि पक्षाची विचारसरणी प्रत्येक युवकापर्यंत पोहचवणे हेच माझे ध्येय राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper