आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात जोरदारपणे सुरू आहे. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील प्रभाग 19 मध्ये महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रचाराचा प्रारंभ झाला. आमदार निधी, जिल्हा वार्षिक योजना, 2515, 3054, सिडको, त्याचबरोबर इतर शासकीय निधीच्या माध्यमातून कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाचा महामेरू उभा केला. सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे याची जाणीव ठेवून त्यांनी काम केले आणि या कामाचे रूपांतर पनवेल मतदारसंघाच्या विकासात झाले. पनवेलचे प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडले. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आले. पनवेलच्या पाणी प्रश्नावर कायमची उपाययोजना व्हावी, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यशही आले, त्यामुळे पनवेलचा पाणीप्रश्न अमृत योजनेतून कायमचा सुटणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली, त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव राज्यभरात झाला आहे. खर्या अर्थाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या कार्यातून पनवेलचा विकास केला. त्यामुळे कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर हक्काने प्रचार करीत आहेत. या प्रचार रॅलीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिरीष बुटाला, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका प्रमिला कुरघोडे, नलिनी शेलार, सुनंदा पाटील, माजी नगरसेवक जगदीश गायकर, अच्युत मनोरे, शिवसेनेचे महानगर संघटक प्रथमेश सोमण, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन मुणोत, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा नेते संजय जैन, सागर ठाकूर, पवन सोनी, कुणाल कुरघोडे, अनिल कुरघोडे, हारुशेठ भगत, गणेश भगत, संतोष गुजरे, यतीन देशमुख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.