Breaking News

‘जैश’चा म्होरक्या मसूदचा मृत्यू?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पुलवामा हल्ल्यासह भारतातील अनेक हल्ल्यांमागे हात असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-महम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, मात्र या वृत्ताला अद्याप पाकिस्तानकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. माध्यमांतील वृत्तानुसार 2 मार्च रोजी मसूदचा मृत्यू झाला आहे, मात्र टाइम्स नाऊच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या परवानगीनंतर मसूदच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. एका मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरैशी यांनी म्हटले होते की, माझ्या माहितीप्रमाणे मसूद खूपच आजारी आहे. तो इतका आजारी आहे की तो आपल्या घरातूनही बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे या वृत्ताची आता बरीच चर्चा होत आहे. मसूद अजहर हा भारताचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी होता.

भारतीय विमानांनी त्या ठिकाणी हल्ले केले जिथे ‘जैश’ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असे. पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता. या हल्ल्यामध्येच मसूद अजहर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत होते. त्यानंतर तो रुग्णालयात उपचार घेत होता. तो किडनी आणि लिव्हरच्या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत होते. त्याच्या मृत्यूबाबत पाककडून कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply