पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर या शब्दाचा दुसरा अर्थ विकासमूर्ती. या विकासमूर्तीच्या प्रचाराचा झंझावात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात होताना दिसत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे पाहता पनवेलचे चित्र विकासात रूपांतरीत झाले. या मतदारसंघाचा जलदगतीने झालेला विकास पाहता कार्यकर्ते हक्काने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी मते मागत आहेत. या पुढील काळातही पनवेलकरांना विकास पाहिजे, यासाठी कार्यकर्ते सरसावले असून जिकडे तिकडे ‘एकच वादा प्रशांतदादा’चा आवाज घुमत आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेविका दर्शना भोईर यांनी दिली आहे. पनवेल शहरातील लाईनआळी येथे झालेल्या प्रचारात नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह माजी नगरसेविका प्रमिला कुरघोडे, माजी नगरसेवक अच्युत मनोरे, माजी नगरसेवक जगदीश गायकर आणि महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी मतदार नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.