Breaking News

नागोठणे विभागात महिलांचा भाजपकडे वाढता कल

महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे प्रदान

नागोठणे : प्रतिनिधी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलाड येथील सरकारी विश्रांतीगृहात नुकतीच भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी नव्याने नियुक्त केलेल्या रोहे तालुक्यातील महिला पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, रोहे तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, उपाध्यक्ष गौतम जैन व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

 नव्याने नियुक्त केलेल्या महिला पदाधिकार्‍यांत फातिमा सय्यद, माधुरी रावकर (तालुका उपाध्यक्ष), अपर्णा सुटे (तालुका चिटणीस), श्रेया कुंटे (नागोठणे विभाग अध्यक्ष), रेखा मुंडे आणि शेहनाज कडवेकर (नागोठणे विभाग उपाध्यक्ष), सोनाली पडवळे आणि संज्योती लाड (नागोठणे शहर सरचिटणीस), शीतल नांगरे, प्रियांका पिंपळे, मुग्धा गडकरी आणि स्वानंदी चितळकर (नागोठणे शहर उपाध्यक्ष) यांचा समावेश आहे.

आमदार रविशेठ पाटील यांच्या चांगल्या प्रतिमेमुळे विभागातील महिलांचा कल हा भाजपकडे आहे व बर्‍याच महिला भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. नागोठणे व विभागात पक्षवाढीसाठी सरचिटणीस आनंद लाड व शहर अध्यक्ष सचिन मोदी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे, असे श्रेया कुंटे यांनी या वेळी सांगितले.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply