Breaking News

विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी -न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी

पेण : मराठी भाषेला संत महात्म्यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी संतांचे साहित्य वाचकांनी वाचले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मराठी वाचन व लेखन संस्कृती जोपासावी, असे आवाहन पेण न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी यांनी येथे केले.

पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती कुलकर्णी बोलत होते. माणसांनी कसे जगावे हे कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातून सांगितले आहे. सर्वसामान्य मराठी माणसाला समजण्यासाठी कोर्टाचा निकालदेखील मराठीतूनच देत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.मराठी ही आचार विचारांची सुसंस्कृत भाषा असल्याचे स्पष्ट करून राजभाषा दिनापुरताच मराठीचा गौरव न करता प्रत्येक मराठी माणसाने सदैव जागृत राहून सातत्याने आपल्या मातृभाषेचा  गौरव केला तर ती अधिकाधिक समृद्ध होईल, असा विश्वास डॉ. अनुपमा धनावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.मुंबईतील मराठी टक्का आज कमी होत आहे. तो कसा वाढेल हे सर्वांनी पाहिले पाहिजे. मराठी भाषा जतन आणि संवर्धन करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक बाळ सिंगासने यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमानिमित्त निबंध, वक्तृत्व, काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आल्या, तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आविष्कार‘ या  भिंतीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण तसेच मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply