Breaking News

करवाढ नसलेला खोपोली पालिकेचा अर्थसंकल्प

खोपोली : कोणतीही करवाढ नसलेल्या खोपोली नगर पालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला बुधवारी (दि. 27) मंजुरी देण्यात आली. खोपोली नगर पालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. या सभेत  सन 2019-20चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात आरंभीच्या शिलकेसह 131 कोटी 23 लाख 47 हजार रु. उत्पन्न, तर अपेक्षित खर्च 130 कोटी 96 लाख 23 रुपये दाखविण्यात आला आहे. 27 लाख 24 हजार 5 रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात आर्थिक उत्पन्न वाढीबाबत काही सूचना वगळता कुठलीही करवाढ करण्यात आली नाही. हा अर्थसंकल्प सभागृहाने एकमताने मंजूर केला. आगामी काळात अद्ययावत भाजी मंडई, व्यापारी संकुल उभारणे, महिला भवन बांधणे, दिव्यांगांकरिता भवन बांधणेे या व एकूण 13 विकासकामांची यादी अर्थसंकल्पात नमूद करण्यात आली. जन्म-मृत्यू दाखला व इतर दाखल्यांसाठी आदिवासी बांधवांना पैसे मोजावे लागणार नाहीत त्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. नगरसेवक किशोर पानसरे, बेबी सॅम्युअल, जीनी सॅम्युअल, सुनील पाटील, विनिता कांबळे व इतर महिला नगरसेवकांनी या वेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला. दरम्यान, प्रत्येक प्रभागात विकासकामांसाठी 30 लाख रुपयांची तरतूद करावी, असा आग्रह सर्वच नगरसेवकांनी या वेळी धरला. मुख्याधिकारी यांनीही त्यास हिरवा कंदील दाखवला. उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, मुख्याधिकारी संजय शिंदे याच्यासह नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी  सभेला उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply