पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण मतदार संघातील गुळसुंदे येथे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 48 लाख रुपये खर्च येणार असून सुसज्य असे सभागृह, नदीवरील घाट बांधण्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी तर शंकर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी 44 लाख 50 हजार रुपयांचा निधी गुळसुंदे वासियांना देण्याचे काम आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदार संघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून दोन्ही मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून आपल्या मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करत आहेत. नागरिकांना भेडसवणार्या समस्यांपासून त्यांची सुटका व्हावी यासाठी दोनीही आमदार परिश्रम घेत असून त्यांचे आभार आपण सर्वांनी मानले पाहिजेत, असे मत या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी व्यक्त केले. या वेळी गुळसुंदे सरपंच सरपंच मीनाक्षी जगताप, उपसरपंच अरुणा पाटील, भाजपचे गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, सदस्य पूजा भोईर, धनश्री गायकवाड, भाजपचे तुराडे गावअध्यक्ष प्रतीक भोईर, माजी उपसरपंच हर्षल पाठारे, सुजित पाटील, काका गायकवाड, परमेश राठोड, करण गायकवाड, राजू राठोड, मांगर्ष राठोड, प्रमोद खाणे, विजय गायकवाड, भानुदास गायकवाड, सचिन चव्हाण, ग्रामस्थ राजेश साठे, आर. डी. पाटील, संतोष चौलकर, शरद ठाकूर, मधुकर मोकळ, योगेश साठे, प्रथमेश पाटील, मनोज पवार, प्रशांत पाटील, मंगेश पाटील, शांताराम मालुसरे, गजानन वीर, जितू गाताडे, अशोक गायकवाड, पोलीस पाटील, प्रमोद विद्वान, वैभव भोईर, दीपक पारंगे, प्रकाश मोरे, बजरंग भागवत, वसंत गोळे, पप्पू मांडवकर, सदस्य महेश पाटील, दीपाली जगताप, जितेंद्र पाटील, रमेश मालुसरे, रचना चव्हाण, आयत्या शिद, अपर्णा चौलकर, सतीश साठे, आशा वीर, काव्या जोशी, आकाश जोशी, रवी जोशी, बाळू जोशी आदी उपस्थित होते.
फोटो – गुळसुंदे
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …