माणगाव : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शनिवारी (दि. 19) माणगावात येत असून, येथील वाजता टिकमभाई मेथा कॉलेजच्या मैदानावर सकाळी 11 वाजता त्यांची महायुतीचे महाड मतदारसंघाचे उमेदवार आमदार भरत गोगावले व श्रीवर्धन मतदारसंघाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. या सभेत उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे दोन्ही मतदारसंघांतील जनतेचे लक्ष लागून राहिले असून, त्यांच्या सभेची तयारी दक्षिण रायगडमधील शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.