Breaking News

‘काँग्रेस-राष्ट्रवादी हे नेता, नीती, नियत नसलेले पक्ष’

नाशिक : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष केवळ स्वार्थ बघतात. नेता, नीती आणि नियत नसलेले ते पक्ष आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी (दि. 14) येथे केली. नाशिक येथील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी सभा सोमवारी नाशिकमध्ये झाली. या वेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराचा समाचार घेतला. हे पक्ष घराणेशाही आणि जातीयवादाचा राजकारण करतात. देशात त्यांच्याकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेवर येणार यात कोणाच्याही मनात शंका नाही, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी काश्मीरमधील कलम 370 हटविण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या निर्णयावरही भाष्य करीत त्याला विरोध करणार्‍या विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply