महायुतीच्या प्रचारात महिलांची लक्षणीय उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) ग्रामीण भागाचा दौरा केला. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या दौर्यात महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी सहभागी होत जोरदार प्रचार केला. चिखले, आरिवली, आजिवली, बोर्ले, भिंगारवाडी, शेडुंग, भिंगार भेरले, सांगडे, बेलवली, वारदोली, हालटेप, तारटेप, माची, लोणिवली, लोणिवली वाडी येथे जाऊन आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन सर्वांनी केले. ठिकठिकाणी स्थानिक महिलांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत मान्यवरांचे औक्षण व स्वागत केले, तसेच प्रचार दौर्यात सहभाग नोंदविला.