Breaking News

खारघरमध्ये शिवसेनेचा प्रचारात पुढाकार

प्रशांत ठाकूर यांच्यासाठी महिला आघाडी ‘आघाडीवर’

पनवेल ः वार्ताहर

पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी खारघरमध्ये शिवसेना महिला आघाडीने मोठी आघाडी घेतली असून घराघरात जाऊन महिला आघाडी महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा कार्यअहवाल मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत.

खारघरमध्ये शिवसेना महिला आघाडी यांच्यासह विविध सामाजिक संघटना, संस्था या महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ उतरले असून त्या प्रत्येक सोसायटीच्या घराघरात जाऊन प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. प्रशांत ठाकूर यांनी गेल्या 10 वर्षांत केलेल्या विकासकामांचा अहवाल लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, तसेच आगामी काळात खारघरचा विकास करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत, त्याची माहिती देत आहेत, तसेच आता नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहेत, याची माहितीही या प्रचारादरम्यान घेण्यात येत असून त्या संदर्भात पाठपुरावा करून या समस्यांचे निवारण केले जाईल, असा शब्दही देण्यात येत आहे.

खारघरमध्ये शिवसेना महिला आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या साथीला भाजप व मित्रपक्षांची महिला आघाडीही असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांना खारघरमधून विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास महिला आघाडीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग, सुविधांचे लोकार्पण

पनवेल ः वार्ताहरडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून चांगली सेवा मिळत असल्याने …

Leave a Reply