Breaking News

विसपुते बी. एड्. महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

पनवेल ः प्रतिनिधी

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रविवारी (दि. 13) मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करण्याचा दृढ निर्धार केला.

महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डॉ. कालिदास शिंदे, संरक्षण अधिकारी राम म्हस्के व बी. एड्. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

डॉ. कालिदास शिंदे यांनी सोडा सारे काम धाम, मतदान करणे पहिले काम, असे म्हणत सर्वांना मार्गदर्शन केले, तर डॉ. सीमा कांबळे यांनी राज्यघटनेतील विविध तरतुदींचा संदर्भ देत निर्भय होऊन मतदान करा, देशाचा सन्मान करा, असे म्हणत मतदानाचे महत्त्व स्पष्ट करत सर्वांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. या वेळी उपस्थित सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करण्याचा दृढ निर्धार केला.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply