Breaking News

पनवेलमध्ये भाजपची विजयी संकल्प बाईक रॅली; आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व; युवाशक्तीचा एल्गार

पनवेल : प्रतिनिधी

भारतमाता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, अब की बार फिर मोदी सरकार… अशा घोषणांनी रविवारी (दि.3) सकाळी पनवेल शहर आणि तालुक्याचा परिसर दणाणून गेला. निमित्त होते पनवेल शहर आणि तालुका भाजपतर्फे काढण्यात आलेल्या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचे. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या बाईक रॅलीत हजारो युवक-युवती स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. भाजपने या वेळी युवाशक्तीचा एल्गारच करून दाखविला.  भाजपतर्फे रविवारी सकाळी पनवेल शहरात विजयी संकल्प रॅली काढण्यात आली.  पनवेल महानगरपालिकेची रॅली नवीन सी. के. टी. महाविद्यालयापासून सुरू झाली, तर पनवेल ग्रामीणची रॅली आदई सर्कलपासून सुरू झाली. या रॅलीत भाजप युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी भाग घेतला.  रॅलीत सहभागी झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्वच पदाधिकार्‍यांनी केशरी रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. शिवाय गळ्यात भाजपचे स्कार्फही होते. त्यामुळे सारा तालुकाच भाजपमय होऊन गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी संपूर्ण देशात भाजपच्या वतीने विजयी संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.पनवेल मतदारसंघातही रविवारी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालय आणि आदई सर्कल येथून भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीला कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, महिला बालकल्याण सभापती लिना गरड, नगरसेवक अरुणकुमार भगत, समीर ठाकूर, संजय भोपी, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, विकास घरत, संतोष शेट्टी, विजय चिपळेकर, अमर पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, दर्शना भोईर, सीताताई पाटील, जयश्री वावेकर, खारघर प्रभाग समिती ‘अ’ अध्यक्ष अभिमन्यू पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply