Breaking News

विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात तीन हजार 483 पोलिसांच्या ताफ्यासह पाच केंद्रीय सुरक्षा बलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि संवेदनशील वाटणार्‍या गावांमध्ये पोलिसांनी संचलन केले.  रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, श्रीवर्धन, महाड, उरण, पनवेल या सात विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (दि. 21) मतदान होणार आहे. जिल्ह्यात एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यात सात महिला उमेदवारांचा समावेश आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील उमेदवार  मतदारांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकीय वातावरण जिल्ह्यात तापू लागले आहे. मोठे वाद, हाणामारीसारखे प्रकार अद्याप समोर आले नसले तरी काही ठिकाणी किरकोळ वाद सुरू झाले आहेत. विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच रायगड पोलीस दलही कामाला लागले आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तपासणी पोलिसांमार्फत सुरू केली आहे. त्यात शांतता कमिटी, तंटामुक्त समितीच्या बैठकाही पोलीस दलाकडून घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 134 पोलीस अधिकारी, दोन हजार 103 कर्मचारी, एक हजार 246 होमगार्ड तसेच केंद्रीय सुरक्षा बल विभागाच्या पाच कंपन्या अशी सुरक्षा व्यवस्था सज्ज आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरे आणि संवेदनशील वाटणार्‍या गावांमध्ये पोलिसांनी संचलन केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply