धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत ही राजकीय दृष्टीने राष्ट्रवादीची ताकद बलाढ्य अशी ख्याती आहे. पण याच ग्रामपंचायत हद्दितील मौजे महादेववाडी गावातील दोन वर्षांपूर्वी केलेल्या विकासाच्या नावाखाली काम न करता फक्त उद्घाटन केले व दोन वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याबाबत काम पूर्ण करा नाहीतर फलक हटाव, अशी आक्रमक भुमिका भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकार्यांनी घेतली होती. विकासासाठी मिळालेल्या लढ्याला यश सपांंदन करीत, नाईलाजाने सत्ताधारी पक्षाला अखेर दोन वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम पुर्ण करावे लागले. दोन वर्षांपासून प्रलंबित कामांचे उद्घाटनाचे फलक ग्रामपंचायत हद्दीत लावण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाने फलक हटाव मोहिमेविरुद्ध आक्रमक पवित्र घेत, कामे पुर्ण करायला लावली. या यशाबाबत समाधान व्यक्त करीत भाजप युवा कार्यकर्ते किरण भगत याच्या पाठपुराव्याने किंवा आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे आणि या लढ्यात खंबीरपणे मार्गदर्शन करणारे भाजयुमो रोहा तालुका सरचिटणीस दिपक भगत यांचे मनापासून आभार व्यक्त केले. अशा सजक तरुणांची आक्रमक फळीजर गावोगावी तयार झाली तर गावपातळीवरच विकासाच चित्र बदलायला वेळ लागणार नाही, असे मत दक्षिण रायगड भाजयुमोचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी भावना व्यक्त करताना केले. या कामगिरीबद्दल भाजयुमो सरचिटणीस दिपक भगत, धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, उपअध्यक्ष रुपेश सुतार तसेच महादेववाडी गावातील भाजप युवा कार्यकर्ते किरण भगत, भाजयुमो उपाध्यक्ष श्रीकांत जंगम यांच्यावर कामगिरीच तालुक्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लोकांच्या सोयी सुविधा, सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत विरुद्ध नेहमीच भाजप कार्यकर्ते यांनी केलेल्या विरोधामुळे प्रलंबित काम पुर्णत्वास गेले आहे व याचे श्रेय भाजपच्या पदाधिकार्यांना जात आहे. -दीपक भगत, तालुका सरचिटणीस, भाजयुमो