Breaking News

गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात टिळक जयंती

गव्हाण ः रामप्रहर वृत्त – येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये जहाल क्रांतिकारी देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने इयत्ता 9वी ’अ’ या वर्गाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्या साधना डोईफोडे यांनी भूषविले. श्रेया मोरे, स्नेहल पाटील व ओम वलटे या विद्यार्थ्यांची तसेच मराठी भाषा शिक्षक  प्रसन्न ठाकूर आदींची भाषणे झाली.

याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक अरुण घाग, रयत को. ऑप. बँकेचे संचालक प्रमोद कोळी, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा प्रमुख  रविंद्र भोईर, सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, इयत्ता 9वी ’अ’चे वर्गशिक्षक चंद्रकांत पाटील तसेच अन्य रयत सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. 9 वी अचा विद्यार्थी विशाल तायडे याने तर आभार प्रदर्शन विजय धोत्रे याने केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply