Breaking News

अफूची शेती करणारे दोघे अटकेत

दौंड ः प्रतिनिधी

मलठण येथे अफूची शेती करणार्‍या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या शेतातून अंदाजे साडेसात लाख रुपयांची अफूची रोपे ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली. या प्रकरणी संतोष अण्णा ढवळे (48) आणि विकास झुंबर ढवळे (27, दोघेही रा. हिंगणीबिर्डी, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या शेतातून 380 किलो ग्रॅम वजनाची अफूची बोंडे आणि फुलोर्‍यात आलेली रोपे जप्त करण्यात आली आहेत. याची बाजरभावतील किंमत साडेसात लाख रुपये आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांना खबर्‍या मार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पावणेचार वाजण्याच्या सुमारास मलठण येथे छापा टाकला असता अफूची शेती होत असल्याचे दिसून आले. संतोष ढवळे याने अर्धा एकरात आणि विकास ढवळे याने दीड गुंठ्यात मका, कांद्याचे गोठ व हरबरा या पिकांत अफूचे आंतरपिक घेतले असल्याचे आढळले. त्यानंतर पथकाने पंचनामा करून तेथील रोपे ताब्यात घेतली. या प्रकरणी काही व्यापार्‍यांचे संपर्क क्रमांक मिळून आले आहेत. यामुळे तेही आरोपी होण्याची शक्यता महाडिक यांनी व्यक्त केली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply