Breaking News

आंदोलनकर्त्यांना वाढता पाठिंबा; ‘रिलायन्स’विरोधातील आंदोलनाचा चौथा दिवस

नागोठणे : प्रतिनिधी

येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, निवृत्त कामगार आणि सुशिक्षित तरुण बेरोजगारांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा सोमवारी चौथा दिवस होता. पोलीस वगळता एकही सरकारी अधिकारी तसेच रिलायन्सचा वरिष्ठ अधिकारी आजपर्यंत येथे पोहचला नसला तरी आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे विविध गावांमधून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. आमच्या मागण्या सहज आणि सोप्या आहेत व त्यांचा  निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाहीत, असे स्पष्ट करून संघटनेचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड यांनी आमचे नेते बी. जी. कोळसे-पाटील तीन दिवसांत दोन वेळा येथे आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हा सर्वांनाच हुरूप आला असल्याचे सांगितले. रिलायन्सचे अधिकारी रमेश धनावडे यांनी 13 नोव्हेंबर रोजी संघटनेची पोलीस अधिकार्‍यांसमक्ष भेट घेतली होती व 27 नोव्हेंबरला चर्चेला बसण्याबाबतचे आश्वासन दिले होते, मात्र 30 नोव्हेंबर येऊनही त्यांचा एकही अधिकारी आमच्यासमोर आला नाही. आंदोलन मागे घ्या, मगच चर्चेला बसू, अशी आता रिलायन्स कंपनीने भूमिका घेतली आहे. पहिली चर्चा करून त्याची लेखी हमी द्यावी, मगच आंदोलन थांबविण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असा आमचा पूर्वीपासून पवित्रा आहे व त्यात तसूभरही बदल केलेला नाही, असे राजेंद्र गायकवाड यांनी ठासून सांगितले. आमचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असून आम्ही अनुचित प्रकार घडवून आणणार नाही, असा विश्वास गायकवाड यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply