Breaking News

पनवेलमध्ये मन की बात विविध ठिकाणी प्रक्षेपण

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 29) उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा कडून भाजप मध्यवर्ती कार्यालयात तसेच माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा चांगला प्रभाव दिसत होता. त्यांच्या भाषणातून उत्तम मार्गदर्शन तसेच विविध विषयांची आणि प्रकल्पांची माहिती झाली. भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश गायकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनिल ढवळे, प्रसाद म्हात्रे, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, सह संयोजक सुरज भोईर, प्रशांत मानकामे, सुरज जितेकर, श्वेता म्हात्रे, शैला दीक्षित, सपना पाटील, पूजा प्रजापती, रमेश प्रजापती, राजेंद्र प्रजापती, शैलेश प्रजापती, विकास प्रजापती, अमित पाटील, राजेश पाटील, अविनाश पाटील, दिलीप राठोड, आशा भारद्वाज, श्वेता म्हात्रे, किशोर म्हात्रे, सपना पाटील, निलेश पाटील, प्रणय फडके, रूपेश तुपे, साहिल राऊत, सुरज जितेकर आदी उपस्थित होते. यासोबतच माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे माजी नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहर चिटणीस रूपेश नागवेकर, राजा चव्हाण, महेश सरदेसाई, अनिकेत जाधव, केतन खुटले, विजय डिसोझा, विनीत मढवी, काटकर काका, सागर मंगवानी, सनी बेद यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय मन की बात कार्यक्रमाचे प्रक्षेपण आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, आपटा ग्रामपंचायत सदस्य असद पिठठु, राजा देशमुख, जासिम ग्यास आदींनी अनुभवले.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply