पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची सामाजिक बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवाळी निमित्ताने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने येथील रेल्वे स्थानका जवळील कृष्ठरोग वसाहतीमधील बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, सल्लागार माधवराव पाटील, प्रवीण मोहकर, राजू गाडे, श्री गणेश कुष्ठररोग वसाहत सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक आंबेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. समाजातील प्रत्येक घटक दिवाळी सण आपआपल्या परीने साजरा करत असतो. पण समाजातील काही दुर्लक्षित घटक आर्थिक परिस्थितीमुळे या सणाचा आनंद उपभोगू शकता नाही. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात समाजाने आणि नातेवाईकांनी नाकारलेल्या कुष्ठरुग्णांची वसाहत आहे. या वसाहतीसाठी पनवेल महापालिकेने वीज, पाणी या प्राथमिक सुविधा दिल्या आहेत. तसेच दारिद्ररेषेखाली सर्व कुटुंबांचा समावेश केला आहे. येथील कुष्ठरूग्णांना पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी दिली.