Breaking News

सिडकोच्या ऑनलाईन सेवांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोच्या वसाहत विभागातर्फे नागरिकांना पुरवण्यात येणार्‍या ऑनलाईन सेवांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वसाहत विभागाच्या सर्व सेवा सिडको महामंडळातर्फे दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी पूर्णतः ऑनलाईन करण्यात आल्या असून नागरिकांना घरबसल्या या सर्व सेवांच्या माध्यमातून सिडकोच्या वसाहत विभागाशी संबंधित कामे करता येणार आहेत. या सेवा पूर्णतः ऑनलाईन झाल्यापासून आजमितीपर्यंत सिडकोकडे विविध सेवांसाठी 7854 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 6206 अर्जांवरील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे तर 1648 अर्जांवरील प्रक्रीया प्रगतीपथावर आहे. वसाहत विभागाशी संबंधित सर्व सेवा ऑनलाईन केल्यामुळे नागरिकांना घरबसल्या कोणत्याही वेळी त्यांच्या इच्छित सेवांसाठी अर्ज करता येतो. त्यामुळे वेळ वाचत असून कार्यालयात येण्याची गरज भासत नाही. वसाहत विभागाशी संबंधित सर्व सेवांचे अर्ज हे ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जातात व संबंधित परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे, आदेश नागरिकांना ऑनलाईन माध्यमातूनच पाठवले जाते. आता नागरिकांसाठी सिडकोच्या वसाहत विभागाशी संबंधित सेवा प्राप्त करणे अतिशय सोपे झाले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply