Breaking News

आमदार महेश बालदी यांचा भाजपला पाठिंबा

मुंबई : रामप्रहर वृत्त

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार महेश बालदी यांनी भारतीय जनता पक्षाला आपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्या संदर्भातील पत्र त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिलेे.

आमदार महेश बालदी यांनी आपल्या पाठिंबापत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मी पूर्ण विश्वास व्यक्त करतो आणि त्यांच्या नेतृत्वात होणार्‍या सरकारला माझा बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply