Breaking News

नवी मुंबई मनपाच्या 12 शाळा झाल्या हायटेक

आमदार मंदा म्हात्रे यांचा विकास निधी

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना सायन्सची गोडी लागून विद्यार्थ्यांचा कल जास्तीत जास्त सायन्सकडे वळावा याकरिता शाळांत डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर उपलब्ध करण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीमधून 66 लाखांचा निधी उपलब्ध केला होता.

या आमदार निधीतून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नवी मुंबई पालिकेच्या एकूण 12 शाळांत डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर उपलब्ध झाले आहे. 1) न.मुं.म.पा शाळा क्र.117, दिवाळे गाव, 2) न.मुं.म.पा शाळा क्र. 1, बेलापूर गाव, 3) न.मुं.म.पा शाळा क्र. 4, सीबीडी, 4) न.मुं.म.पा शाळा क्र. 10, नेरूळ गाव, 5) न.मुं.म.पा शाळा क्र. 17, जुईनगर, 6) न.मुं.म.पा शाळा क्र. 12, सारसोळे गाव, 7) न.मुं.म.पा शाळा क्र. 112, करावे, 8) न.मुं.म.पा शाळा क्र. 107, तुर्भे, 9) न.मुं.म.पा शाळा क्र. 9, से-16 नेरूळ, 10) न.मुं.म.पा शाळा क्र. 15, शिरवणे, 11) न.मुं.म.पा शाळा क्र. 18, सानपाडा, 12) न.मुं.म.पा शाळा क्र. 11, कुकशेत आदी शाळांचा यात समावेश आहे. सदर डिजिटल क्लासरूम व सायन्स सेंटरचा उद्घाटन सोहळा सीबीडी सेक्टर-8 येथील महापालिका शाळा क्र. 4मध्ये नुकताच पार पडला. उद्घाटन सोहळा नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते उद्घाटन फीत कापून व दीपप्रज्वलनाने करण्यात आला.

या वेळी आ. मंदा म्हात्रे यांच्या समवेत नगरसेविका सरोज पाटील, माजी परिवहन सभापती साबू डॅनियल, डॉ. जी. के. डोंगरगावकर, शिक्षण अधिकारी संदीप संगवे, प्रसिद्ध चित्रकार सुभाष पवार, जगप्रसिद्ध जादुगार सतीश देशमुख तसेच डिजिटल क्लासरूम व मिनी सायन्स सेंटर साकार केलेले एज्युलाईट सॉफ्टवेअरचे अजय भरताव व डॉ. सारिका, किशोर नाईक, राजू तिकोने तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकांच्या 12 शाळा आता हायटेक झाल्या असून, अजून 16 शाळांसाठीदेखील आमदार मंदाताई म्हात्रे यांचा आमदार निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याने पालिकेच्या शाळांतील सर्वच विद्यार्थी हायटेक होणार आहेत.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply