Breaking News

कृषी आयुक्तांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

मोहोपाडा : प्रतिनिधी

ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या शेतीचे नुकसान बघण्यासाठी राज्य कृषी आयुक्त पुणे यांनी नुकताच खालापूर तालुक्याचा दौरा केला. संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक प्रसंगांना तोंड देत बळीराजाने आपली शेती उभी केली होती, पण ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आणि बळीराजाचे होत्याचे नव्हते झाले. या पावसाने झालेले नुकसान भरून न येणारे आहे. कापलेली भातशेती वाहून जाण्याबरोबर पाण्यावर तरंगत आहे, तर तयार झालेल्या दाण्याचे बीजांकुरात रूपांतर झाले आहे. पावसाच्या भीतीने उभे आडवे असलेले भातदेखील कापता येत नाही. जांभिवलीचे समाजसेवक सुरेश गावडे यांनी याबाबत सविस्तर माहिती शासनाला दिली. शासनाच्या आदेशानुसार राज्य कृषी आयुक्त अनिल बनसोडे यांनी खालापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे. तशा प्रकारचा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले, मात्र उशिरा पडलेल्या पावसामुळे दुबार पेरणी, लावलेली भातशेती अतिवृष्टीमुळे वाहून गेली. याचे पंचनामे होऊन अद्यापही नुकसानभरपाई शासनाने दिली नाही, अशी तक्रार शेतकर्‍यांची आहे. ही नुकसानभरपाई पूर्णपणे रोख व त्वरित मिळावी, अशी मागणी विजय कापरेकर यांनी केली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply