Breaking News

लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची एसबीआयची सूचना

मुंबई ः प्रतिनिधी

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पेन्शनधारकांना ज्यांचे निवृत्ती वेतन एसबीआयच्या खात्यात जमा होते अशांना 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आपलं लाइफ सर्टिफिकेट (जिवंत असल्याचं प्रमाणपत्र) जमा करण्यास बँकेकडून सांगण्यात आलं आहे. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत हे लाइफ सर्टिफिकेट किंवा जिवंत असल्याचं प्रमाणपत्र जमा केले जाऊ शकते, तसेच जवळच्या आधार सेंटर आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर हे जमा करता येईल. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनरला आपल्या बँकेत जाऊन रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करून आपण जिवंत असल्याचे प्रमाण द्यावे लागते. जर हे सर्टिफिकेट जमा केले नाही, तर पेन्शनधारक आपल्या बँक खात्यातून पेन्शन काढू शकणार नाहीत किंवा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असं एसबीआयकडून ट्विटरद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply