मोहोपाडा : प्रतिनिधी
वाशिवली येथील पारनेरकर महाराज विद्यालयात दहावीनंतर अनेक मित्र दुरावले. यापुढे आपण भेटू की नाही हाच विचार प्रत्येकाच्या मनात रेंगाळत होता, मात्र जे शक्य नव्हते ते सत्यात उतरले अखेर सतरा वर्षांनी. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून सर्व मित्र सेलिब्रेशन करण्यासाठी मारुती पाटील फार्म हाऊस भिलवले येथे एकत्र आले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक जण आपल्या प्रवासाला लागला होता, मात्र जुने मित्र एकत्र येतात तेव्हाच खर्या अर्थाने तो आनंदाचा क्षण शब्दात वर्णन करू शकत नाही. अशीच स्थिती या मित्रांची झाली होती, शाळेमध्ये शिक्षण घेत असताना रोज भेटीगाठी होत असायच्या, मात्र शिक्षण पूर्ण झाले आणि त्या शाळेतील मित्रांच्या आठवणीने फक्त दिवस जात होते. जेव्हा हेच मित्र आपल्यासमोर उभे राहिले त्या वेळी त्यांच्या चेहर्यांवर हावभाव वेगळेच होते. या वेळी शाळेतील जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. त्या वेळच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. या एकत्र आलेल्या मित्रांमध्ये अमोल मालकर, राजेंद्र दासवंते, महेश पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, रमेश मुसळे, संदीप शिंदे, नीता मुंढे, आशा जाधव-पत्की, माधुरी पाटील-लहाने, रेश्मा पाटील-विशे, मनीषा मुंढे-जाधव, योगिता पाटील, नवनिता म्हात्रे या सर्वांचा सहभाग होता.