Breaking News

कुत्र्याला घराबाहेर काढल्याने मुलीची आईविरोधात तक्रार

मुंबई : प्रतिनिधी

आईने भटक्या कुत्र्याला घराबाहेर काढले म्हणून मुलीने आईविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याची घटना घाटकोपर पंतनगरमध्ये घडली आहे. मुलगी काही महिन्यांपूर्वी या कुत्र्याला घरी घेऊन आली होती. आईविरोधात प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवण्यात आली आहे. घराबाहेर काढल्यापासून हा कुत्रा बेपत्ता आहे. आई विरोधात तक्रार नोंदवणार्‍या तरुणीचे नाव स्नेहा निकम आहे. या वर्षी जानेवारी महिन्याच्या स्नेहाच्या मैत्रिणीला रस्त्यात कुत्र्याचे पिल्लू सापडले. ती नेहाच्या घरी घेऊन आली. आपण त्या कुत्र्याच्या पिल्लाचे ‘कुकी’ असे नामकरण केले व त्याची देखभाल करीत होतो, असे नेहाने सांगितले. 6 सप्टेंबरला सकाळी 5.30च्या सुमारास नेहाला तिच्या आईने अश्विनीने उठवले व कुकी सोसायटी बाहेर गेल्याचे सांगितले. स्नेहा लगेच झोपेतून उठली व तिने कुकीचा शोध सुरू केला, पण अनेक तास प्रयत्न करुनही कुकीचा शोध लागू शकला नाही. स्नेहाने इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तिच्या आईने सकाळी सव्वाचारच्या सुमारास कुकीला इमारतीबाहेर नेल्याचे दिसले. स्नेहाने जेव्हा याबद्दल आपल्या आईला विचारले तेव्हा कुकीला मी बाहेर घेऊन गेले, पण तो कुठे गेला हे माहीत नाही, असे उत्तर दिले.

‘माझी आई जाणीवपूर्वक कुत्र्याला बाहेर घेऊन गेली व त्याला रस्त्यात सोडले. ती माझ्याबरोबरही खोटे बोलली, पण सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर आले. कुकीला कुठे सोडले याबद्दल मी तिला वारंवार विचारले, पण तो कुठे गेला ते आपल्याला माहित नाही एवढेच उत्तर ती देते, असे स्नेहाने सांगितले. कुत्र्याची माहिती देणार्‍याला इनाम देण्याचीही स्नेहाची तयारी आहे. स्नेहाने आपल्याच आईविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. अश्विनी यांचे स्टेटमेंट नोंदवण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलावले आहे. आम्ही आवश्यक कारवाई करू, असे पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply