Breaking News

नेमबाज चिंकीला ऑलिम्पिक तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

युवा नेमबाज चिंकी यादवने शुक्रवारी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करीत भारतासाठी ऑलिम्पिकची 11वी जागा निश्चित केली. चिंकीला पदकाला गवसणी घालता आली नसली तरी तिने आपल्या कारकिर्दीत पात्रता फेरीतील सर्वोत्तम 588 गुण मिळवत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती तसेच जागतिक कनिष्ठ गटात कांस्यपदक पटकाविणार्‍या चिंकीला पात्रता फेरीतील सातत्य अंतिम फेरीत राखता आले नाही. त्यामुळे तिला 116 गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply