Breaking News

रावे मोराकोठा पाणी योजना मंजूर ; राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निधीची तरतूद

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील रावे ग्रामपंचायत हद्दीतल रावे मोराकोठा पाणी योजनेला मंजूरी मिळाली असून, या योजनेसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, मंत्रालयात झालेल्या बैठकीत रावे मोराकोठा पाणी योजनेच्या मंजुरीचे पत्र आमदार निरंजन डावखरे आणि भाजप युवानेते वैकुंठ पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

पेण तालुक्यातील रावे मोराकोठा हे समुद्र खाडीत वसलेले बेट आहे. येथील ग्रामस्थांना समुद्र खाड्यातून होडीने कर्नाळा नाका येथे जावून, प्लास्टिक टाक्यातून पाणी आणावे लागते.  पावसाळ्यात किंवा वादळी वार्‍यात या लोकांना जिवावर उदार  होऊन पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.  रावे मोराकोठा पाणी योजनेला मंजूरी मिळाली असून, येत्या डिसेंबरपर्यंत या योजनेंचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे वैकुंठ पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

-रावे मोराकोठा पाणी योजना मार्गी लागावी यासाठी माजी मंत्री रविशेठ पाटील यांसह आम्ही गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर या सर्वांच्या प्रयत्नांमुळे योजनेला मंजुरी मिळाली आहे.

 -वैकुंठ पाटील, युवा नेते, भाजप, पेण.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply