Breaking News

फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पराभव : महमदुल्ला

राजकोट : वृत्तसंस्था

बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्ला याने दुसर्‍या ट्वेन्टी-20 सामन्यातील पराभवासाठी फलंदाज दोषी असल्याचे म्हटले आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांच्या हाराकिरीमुळे बांगलादेशला पराभव पत्करावा लागला, असे महमदुल्लाने सांगितले.

बांगलादेशच्या फलंदाजीबद्दल महमदुल्लाने सांगितले की, आम्हाला आमच्या फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही, पण फलंदाजीतील काही कमकुवत बाजूंवर अद्यापही मेहनत घ्यावी लागेल. 12व्या षटकात 102 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर आम्ही 180पेक्षा अधिक धावा उभारण्याची गरज होती. फलंदाजीसाठी खेळपट्टी पोषक असल्यामुळे अधिकाधिक धावा करण्याची संधी आम्ही गमावली. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जर 40 चेंडू निर्धाव घेतले, तर सामना जिंकण्याची संधी कमी होते. आम्ही 38 चेंडू निर्धाव घेतले.

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीविषयी महमदुल्ला म्हणाला, रोहित बहरात आला की त्याला रोखणे कठीण असते. चौफेर फटकेबाजी करणार्‍या रोहितला गोलंदाजी कुठे करायची, हा सर्वच संघांना प्रश्न असतो.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply