Breaking News

मासेमारी करणार्या दोन गटांत भरसमुद्रात हाणामारी

अलिबाग : प्रतिनिधी

एलईडीद्वारे मासेमारी करणारे आणि बुल नेट मासेमारी करणार्‍या आक्षी आणि बोडणीमधील मच्छीमारांच्या दोन गटांमध्ये समुद्रात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांतील आठ जण जखमी झाले. जखमींवर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरूड तालुक्यातील कोर्लई समुद्रात ही घटना घडली. 

एलईडीमार्फत मासेमारी करणे हे कायद्याने गुन्हा असतानादेखील आक्षी येथील चार मासेमारी बोटी एलईडीच्या माध्यमातून मुरूड-कोर्लई समुद्र परिसरात मासेमारी करीत होत्या, तर बोडणी येथील मच्छीमार हे दोन बोटींच्या सहाय्याने बुल नेट मासेमारी करीत होते. त्या वेळी त्यांनी समोरून येणार्‍या आक्षीमधील मच्छीमार बोटींना बाजूला जाण्याचा इशारा केला, मात्र बोटीला असलेल्या वेगामुळे बुल नेट मासेमारी करणार्‍या मच्छीमारांच्या जाळी तोडल्या. त्यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

यावरून दोन गटांत समुद्रातच दगडफेक करून हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले होते, मात्र पुन्हा शुक्रवारी (दि. 15) हे प्रकरण चिघळले. दरम्यान, आमदार  महेंद्र दळवी यांनी दोन्ही गटांच्या सदस्यांना एकत्रित बसवून समझोत्याने तोडगा काढून हे प्रकरण मिटविले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply