Breaking News

निडी येथे रेल्वे फाटक सुरक्षा जनजागृती अभियान

रोहे ः प्रतिनिधी

येथील रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने निडी रेल्वे फाटक येथे निरीक्षक सतीश विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे फाटक सुरक्षा जनजागृती अभियान रबविण्यात आले. रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर ते लगेचच उघडावे, असे प्रवासी गेटमेनला सांगतात. फाटक उघडले नाही तर गेटमेन व प्रवाशांत बाचाबाची होते. वास्तविक रेल्वेकडून सूचना आल्यानंतरच फाटक बंद अथवा उघडण्यात येते. रेल्वे फाटक उघडण्यासाठी प्रवासी गेटमेनकडे तगादा लावत असतात. हे रेल्वे सुरक्षेच्या विरोधात आहे. त्यामुळे प्रवाशांनी गेटमेनशी हुज्जत घालू नये, असे या जनजागृती अभियानात सांगण्यात आले. रेल्वे फाटक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रोहा रेल्वे पोलीस ठाण्याने निडी येथे राबविलेल्या या जनजागृती अभियानाच्या वेळी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक द्वारकाप्रसाद चौधरी, प्रधान रक्षक अनिल सोनुले, शिवाजी पाटील, धर्मेंद्र कोळी, महासंघाचे रोहा तालुका अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, निडी तर्फे अष्टमी ग्रामपंचायत सदस्य परशुराम वाघमारे, काशिनाथ पाटील, अवंतिका पाटील, ज्ञानेश्वर भोईर, नथुराम तांडेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply