Breaking News

राष्ट्रध्वजासंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पनवेल महापालिकेकडून घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत पनवेलमधील पटेल पार्क व व्यंकट रेसिडेन्सी येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राहिवाश्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या वेळी राहिवाश्यांना राष्ट्रध्वजाविषयी माहिती देण्यात आली. घरोघरी तिरंगा हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस असून यासंदर्भातील नियमांची माहिती महापालिका उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली, तसेच रहिवाश्यांना झेंड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका एनजीओचे सदस्य विजय चव्हाण तसेच जाणीव एक सामाजिक संस्थेचे प्रसाद हनुमंते उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply