Breaking News

नागाव बीच झाला चकाचक

ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले श्रमदान

रेवदंडा ः प्रतिनिधी

नागाव ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून अलिबाग वनखात्याच्या सहकार्याने नागाव समुद्रकिनारी व सुरूबन स्वच्छता अभियान नागाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून संपन्न झाले. शनिवारी नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागाव समुद्रकिनारी व सुरू बनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह अलिबाग वनखात्याचे अधिकारी या स्वच्छता अभियानास उपस्थित होते. नागाव हायस्कूलच्या असंख्य विद्यार्थ्यांनी नागाव बीच चकाचक करण्यासाठी बहुमूल्य श्रमदान केले.

नागाव समुद्रकिनारा व सुरूबन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. नित्याने मोठ्या संख्येने नागाव समुद्रकिनार्‍यास व सुरूबनास पर्यटक भेटी देतात. नागाव ग्रामपंचायत नागाव समुद्रकिनारा व सुरूबनाची स्वच्छता राखण्यासाठी विविध स्तुत्य उपक्रम राबवत असते. त्यामधून नागाव सरपंच निखिल मयेकर यांनी नागाव ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना नागाव समुद्रकिनारा व सुरूबन स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. नागाव समुद्रकिनारा व सुरूबन स्वच्छता अभियानाचे नियोजन ग्रा.प. सदस्या हर्षदा मयेकर यांनी केले होते. या वेळी नागाव ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या तसेच कर्मचारीवर्ग यांनी या नागाव समुद्रकिनारा व सुरूबन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता.

सकाळी साडेआठ वाजता नागाव समुद्रकिनारा व सुरूबन स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या वेळी सरपंच निखिल मयेकर यांच्यासह नागाव ग्रामंचायत सदस्य व सदस्या, ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग व नागाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हातात फावडी, घमेले तसेच टोपली आदी स्वच्छतेसाठीचे साहित्य घेऊन श्रमदान केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply