कडाव : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतमधील 21 दिव्यांग बांधवांसाठी आपल्या पाच टक्के निधीतून 50 टक्के अपंग असणार्यांसाठी चार हजार व 50 टक्केवरील अपंगत्व असणार्या बांधवांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष सहाय्य करण्यात आले.
गुरुवारी सकाळी 11 वाजता किरवली ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक बैठकीत किरवली ग्रामपंचायत हद्दीतील किरवली, देऊळवाडी, वांजले, सावरगाव आणि ठाकूरवाडीतील दिव्यांग बांधवांसाठी विशेष निधी वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रम किरवली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दत्तात्रेय सांबरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी उपसरपंच निशा साळोखे, सदस्य बिपीन बडेकर, बबन गायकर, स्नेहा भोईर, मोनिका बडेकर, आरती बडेकर, दर्शना कर्णूक, श्रध्दा शेळके, चित्रा पारधी, हिरामण गायकवाड, ग्रामविकास अधिकारी एस. पी. पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.