Breaking News

भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत्त
माणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (दि. 22) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून भाजप नेते अरुणशेठ भगत यांचे अभीष्टचिंतन केले. यामध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध संस्था-संघटनांचे पदाधिकार्‍यांनी अरुणशेठ शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अरुणशेठ भगत यांनी वर्षानुवर्षे सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवही यावेळी उपस्थित मान्यवरांनी केला.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply