Breaking News

म्हसळा भाजपने केला राहुल गांधींचा निषेध

म्हसळा : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा म्हसळा तालुका भाजपतर्फे निषेध करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी या वेळी केली. म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी म्हसळा-श्रीवर्धन रस्त्यावर हातात पोस्टर्स घेऊन राहुल गांधी व काँग्रेसविरोधात या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. भाजपचे माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, मंगेश मुंडे, लहू तुरे, समीर धनसे, तुकाराम पाटील, अनिल टिंगरे, राजा चव्हाण, सुनील शिंदे, प्रसाद विचारे, भालचंद्र करडे, विजय पाष्टे, सुनील विचारे, मनोहर जाधव, राजेंद्र चव्हाण, किशोर गुलगुले, रामजी टिंगरे, सुनील पाटील, घनश्याम जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply