नागोठणे : प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलला कै. मामा शहासने सभागृह असे नाव देण्यात आले असून आज प्रत्यक्षात हा नामकरण विधी होत आहे. या कार्यपूर्तीने समाधान वाटत असल्याची भावना जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीकडून नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघटनेस सभागृह उपलब्ध करण्यात आले. त्याला सुधाकर काशिनाथ उर्फ मामा शहासने सभागृह असे नाव देण्यात आले असून, त्याचा नामकरण समारंभ रविवारी दुपारी पार पडला. त्या वेळी किशोर जैन बोलत होते. कार्यक्रमास सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर, स्थानिक संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी, मुकुंद मोदगी, उल्हास शिंदे, चंद्रकांत कामथे, नवीन सोष्टे, काकासाहेब माने, जयराम पवार, दिलीप शहासने, नंदकिशोर मोरे, डॉ. राजेंद्र धात्रक, माजी सरपंच प्रकाश जैन, ग्रा. पं. सदस्य अतुल काळे, डॉ. अभिषेक शहासने, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रकाश स. जैन, भोईर गुरुजी आदी मान्यवरांसह कै. शहासने यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. मामा शहासने यांनी शहरात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापून ज्येष्ठ नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले, असे नितीन शहासने, माधवसिंग परदेशी, विजय शहासने, घिसुशेठ जैन, प्रकाश जैन यांनी आपल्या भाषणात सांगून कै. शहासने यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन विजय शहासने, तर उल्हास शिंदे यांनी आभार मानले.
Check Also
पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …