Breaking News

लांडोरची शिकार करणारे अटकेत

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या डोंगरात लांडोर पक्षाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पनवेल तालुक्यातील डोलघर येथील मुकेश पाटील (30), अजित गायकर(26), प्रेमनाथ गायकर (24), चंद्रकांत पाटील (36) या चार आरोपींना काल शुक्रवारी अटक केली आहे.

उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या वरच्या भागातील डोंगरात गुरुवारी 9 जुलै रोजी रात्री 8 वाजताचे सुमारास अवैधरित्या पक्षांची शिकार करण्यासाठी घुसले होते. मात्र पक्षांच्या शिकारीला निघालेल्या शिकार्‍यांवर उरण तालुक्यातील कोप्रोली येथील जिव्हाळा फाऊंडेशनचे सदस्य व पशुपक्षी प्रेमी रुपेश पाटील,पंकज ठाकूर, भावेश म्हात्रे, भूषण म्हात्रे, अंगराज म्हात्रे, यतीन म्हात्रे व अश्विन म्हात्रे या तरुणांनी नजर ठेवली होती.

शिकारीसाठी अंधारातच जंगलात घुसलेल्या शिकार्‍यांची माहिती वनविभागाला देण्यात आली. खबर मिळताच वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी एन. एम. कुंथे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण विभागाचे आरएफओ शशांक कदम यांनी एस. ए. कदम, सन्नी ढोले, संतोष इंगोळे आणि वनरक्षक एस. एस. बोरसे आदी सहकार्‍यांसह जंगलात धाव घेतली.

वरील तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शिकार करून मोटार सायकलवरुन परतणार्‍या शिकार्‍यांना मध्येच अडवून चौकशी केली.

या शिकार्‍यांच्या मोटरसायकलवरील सामनाची तपासणी केली असता, पिशवीत शिकार करुन मारलेले मृत लांडोर आढळून आले. तसे शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या तत्सम सामानही सापडले. त्यामुळे या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर दोन्ही मोटार सायकल जप्त करून चौघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती उरणचे परिक्षेत्र वनाधिकारी शशांक कदम यांनी दिली आहे.

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply