रोहे ः प्रतिनिधी : आयुष्यात आत्मविश्वास, ध्येय, जिद्द, प्रयत्न, संयम ही पंचसूत्री अंगीकारल्यास आपण विविध स्पर्धा परीक्षांत सहज यश संपादन करू शकतो. महिलांनी स्पर्धा परीक्षेतून करिअर घडवावे, असे आवाहन रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी येथे केले.एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या रोहे येथील एम. बी. मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या चौथ्या वार्षिक पदवीदान समारंभात अमोल गायकवाड उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करीत होते. प्रास्ताविकात प्राचार्य हनुमंतराव ढवळे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सुदर्शन कंपनीचे मॅनेजर बी. एन. कदम यांचे या वेळी समयोचित भाषण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न म्हसाळकर यांनी केले. रोहा पंचायत समिती उपसभापती विजया पाशिलकर, आकाश केडिया, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव मोरे, माधुरी सनस, रवी दिघे, रूपेश मालवाले, अजिंक्य धरम आदी या वेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …