Breaking News

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद

रोहे : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील सर्वांत जुने असलेले धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत. कारखान्यातील अत्यावश्यक सेवा सुरू असून कामगारांना सुटी देण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे कामगार व सुरक्षा विभाग  कामावर आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रात 36 कारखाने सुरू असून यातील 90 टक्के रासायनिक कारखाने आहेत.

रासायनिक कारखाने असल्याने कोणतीही जोखीम होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून हे कारखाने प्रशासनाच्या सूचनेनुसार बंद ठेवण्यात आले असून अतिमहत्त्वाच्या रासायनिक प्रक्रिया असेल तर कमीत कमी प्रमाणात सुरू ठेवण्यात आले आहेत. 90 टक्के कारखाने बंद असून अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे कामगारच कामावर आल्याचे रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बारदेशकर यांनी सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply