Breaking News

भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने कळंबोलीत उत्साह

कळंबोली : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी (दि. 23) सकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. त्याच वेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना शपथ दिली. त्यामुळे महाराष्ट्रात लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली आहे. भाजपने स्थिर सरकार स्थापन करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

त्यामुळे भारतीय जनता पक्षात अतिउत्साहाचे वातावरण पसरले असून, कळंबोली येथील पक्षाच्या कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकाला मिठाई भरवून आनंद साजरा केला. या वेळी कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील,  कळंबोली शहर महिला अध्यक्ष प्रियंका पवार, पनवेल तालुका उपाध्यक्ष डी. एन. मिश्रा, राजूशेठ बनकर, कमळ कोठरी, प्रकाश शेलार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उरणमध्येही जल्लोष

उरण : दिनेश पवार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 23) शपथ घेतली. यानिमित्त उरण भाजप कार्यकर्त्यांनी विजयाची  मिरवणूक काढून उरण शहरात एकच जल्लोष केला. उरण भाजप कार्यलयातून मोठी मिरवणूक काढली. फटाक्यांची अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटण्यात आले. ही मिरवणूक भाजप कार्यालयापासून पुढे गणपती चौक, राजपाल नाका, जरीमरी मंदिर, बाजारपेठ, गांधी चौक अशी फिरून पुन्हा भाजप कार्यालयाजवळ विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीत, तसेच जल्लोषात नवनिर्वाचित आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, नगरसेविका जान्हवी पंडित, यास्मिन गॅस, उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, भाजप रायगड जिल्हा वाहतूक अध्यक्ष सुधीर घरत, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, सागर मोहिते, दिनेश ठक्कर, चंद्रहास घरत, राजेंद्र पडते, राजेश कोळी, मदन कोळी, संतोष ओटावकार, मनन पटेल, हसमुख मेहता, नरेश गावंड, सुनील पाटोळे, जसिम गॅस, हितेश शाह आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply