Breaking News

मद्यविक्री करणार्‍या दोघांना अटक

खोपोली ः बातमीदार

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत मद्यविक्रीला बंदी असतानाही विदेशी दारूची विक्री करणारे वासुदेव धामणसे (रा. खानाव, ता. खालापूर) आणि निलेश दळवी (होराळे, ता. खालापूर ) या दोघांना खालापूर पोलिसांनी मंगळवारी (दि. 14) रात्री उशिरा अटक केली.

खालापुरातील साजगाव हद्दीत धाब्यावर बेकायदेशीर मद्यविक्री होत असल्याची गुप्त माहिती खबर्‍यामार्फत पोलिसांना मिळाल्यावर मंगळवारी रात्री पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितीन शेडगे, दत्तात्रय किसवे, हेमंत कोकाटे यांनी छापा टाकला असता धामणसे आणि दळवी विनापरवाना विदेशी दारूची विक्री करताना आढळले. त्यांच्याकडे 1870 रुपयांचे विदेशी मद्य सापडले. बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री केल्याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियम 1949चे कलम 65 (ई) 83प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार

जे. पी. म्हात्रे करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply